कडधान्य - हरभरा

१)हरभरा


शास्त्रीय नाव : Cicer Qurientum

इंग्रजी नाव : Bengal Gram

हिंदी नाव : चना



हरभरा डाळ



• हंगाम : 

             रब्बी हंगामातील पीक असून पेरणी हिवाळ्यात केली जाते.जिरायती हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेंबर ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. बागायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. यामुळे जास्त उत्पादन मिळण्यास पोषक असलेल्या हवामानाचा पिकास उपयोग होतो.

__________________________________________

• जमीन : 

              हरभऱ्यासाठी मध्यम व भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. 

__________________________________________

• आकार :

                हरभऱ्याच्या वनस्पतीची उंची ५०-६० सेमी. असते.पाने हिरव्या रंगाची असून त्यांचा आकार लहान असतो.

__________________________________________

• कालावधी :

                     ३-४ महिन्यात हरभऱ्याचे पीक येते.

   _________________________________________

• जाती :

             गरडा , काटाळ , अन्नेगिरी , विश्वास , काबुली , चाफा , विजय , श्वेता इ. 

  _________________________________________           

• फुले :

               हरभऱ्याच्या फुलांचा रंग लाल, पांढरा असतो.

               

__________________________________________

• उत्पादन क्षेत्र :

                         महाराष्ट्र व कर्नाटकात हरभऱ्याचे पीक घेतले जाते.


__________________________________________

• साठवण : 

                  हरभऱ्याची साठवण गोणी किंवा डब्यामध्ये केली जाते.

__________________________________________

•विक्री : 

               कच्चा हरभरा (डहाळ) हा पेंढीच्या स्वरूपात विकतात. तर वाळलेला हरभरा किलोवर विकला जातो.

__________________________________________

• शेंगा :

              हरभऱ्याच्या शेंगा(डहाळे) आकाराने लहान असून,त्यात दोन बिया असतात.  



हरभरा (डहाळ)

_________________________________________

• जीवनसत्व :

                         हरभऱ्यामधून प्रथिने व (B) ब-जीवनसत्त्व मिळते.                  

__________________________________________

• फायदे :

                 १) हरभऱ्यामध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभ-याचा कोवळा पाला, पीठ व डाळ याचा भरपूर उपयोग करतात. हरभ-याच्या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठी करतात. 

              २) फुले येण्याच्या सुमारास हरभ-याच्या पानावर एक प्रकारचे आम्ल तयार होते. पहाटे त्याच्यावर पातळ कापड दीड ते दोन तास पसरून ठेवले की ते दवाने ओले होते व पानावरील आम्ल त्यात उतरते. कापड पिळून आम्ल बाटलीत गोळा करतात त्यापासून उत्तम आम किंवा खारी तयार करता येते. 



            ३) हिरवी मिळणारी आम उत्तम औषधी असून त्यामध्ये मॉलिक अ‍ॅसिड (९० ते ९५ टक्के) ऑक्झालिक अ‍ॅसिड (५ ते १० टक्के)असतात. ही आम वांत्या (ओकारी), अग्निमांद्य, अपचन, पटकी, अमांश व संधिभंग होते यावर शिजवलेल्या पानांचा लेप अत्यंत गुणकारी असतो.

             ४) हरभरा हा स्नायूंना बल देणारा आहे. त्यास ‘घोडे का खाना’ असे म्हटले जाते. तरुणांना शरीर कमवायचे असेल तर हरभरा हे स्वस्त आणि मस्त प्रोटिन फुड आहे. हरभ-यातील प्रथिने मिळवायची असल्यास त्यास भाजून किंवा वाफवून घ्यावे. तसेच प्रथिनांची साखळी पूर्ण होण्यासाठी हरभरा हा दही, ताक, पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लेला चांगला. 

         


     ५) हरभरा डाळ ही बल प्रदान करणारी डाळ आहे. प्रथिने, ब- जीवनसत्व व अनेक क्षारांनी ती परिपूर्ण आहे. वयात आलेली मुले, क्रीडापटू, कष्टकरी माणसे, शरीरसौष्ठव संपादन करण्यासाठी हरभरा डाळ ही उत्तम स्नायूवर्धक आहे. नित्यनेमाने व्यायाम करणा-यांनी हरभरा डाळीचे पदार्थ- सांडगे, पिठले, घावन, भजी इत्यादी यथेच्छ खावेत. 


__________________________________________

• पिकांवर पडणारा रोग :

                                            अळी , मावा , तुडतुडा , खुजा इ.                                       

__________________________________________

• हरभरा पासून बनवले जाणारे अन्न पदार्थ : 

                                                                          उसळ , पुरणपोळी , बुंदी लाडू , बेसन लाडू , भजी , वडा , शेव , उत्तपा , चकली , ढोकळा , पिठले इत्यादी.

__________________________________________


Comments